शेतकर्‍याची जळगावातून दुचाकी लांबवली


The farmer’s bike was extended from Jalgaon जळगाव : शहरातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ दुचाकी लावून कामानिमित्त गावात गेलेल्या शेतकर्‍याची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकींच्या वाढल्या चोर्‍या
दिनेश सुखदेव पाटील (45, धानवड, जि.जळगाव) हे शेतकरी बुधवार, 15 मार्च रोजी दुपारी एक वाजता दुचाकी (एम.एच.19 डी.जी.3963) ने जळगाव शहरात खाजगी कामानिमित्त आल्यानंतर त्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी नेरीनाका जवळील स्मशानभूमीच्या बाहेर लावली मात्र ते निघून गेले मात्र दुपारी दोन वाता आल्यानंतर त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. सोमवारी त्यांनी तक्रार दिल्यानंतर शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास रवींद्र बोदवडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !