सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ


जळगाव : अमेरिका व इराणमधील तणावामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. दोन दिवसात सोने व चांदीच्या भावात प्रत्येकी एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोने 40 हजार 600 रुपये प्रती तोळा तर चांदी 48 हजार रुपये प्रती किलोवर पोहोचली आहे. अमेरीरका व इराणमधील युद्धजन्य स्थितीमुळे सोने-चांदीच्या भावावर मोठा परीणाम होत आहे. 1 जानेवारीला सोने 39 हजार 500 रुपये होते. 2 जानेवारीला 100 रुपयांनी वाढ ते 39 हजार 600 रुपये प्रती तोळा झाला. सोने-चांदीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.


कॉपी करू नका.