अमृत योजनेच्या चौकशीसह रस्त्यांची कामे मार्गी लागण्यासाठी उद्या रस्ता रोको


माजी आमदार संतोष चौधरी : अतिक्रमणधारकांचे त्याच जागेवर पुर्नवसनाची मागणी

भुसावळ : शहरातील रस्त्यांची दुरवस्था थांबवावी, अमृत योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची दोषींकडून वसुली करावी शिवाय कोच फॅक्टरीच्या नावाने अतिक्रमण हटवून गोरगरीबांचे संसार उघड्यावर आल्याने अतिक्रमणधारकांना पुन्हा रेल्वेच्या त्याच जागेवर निवारा बांधू द्यावा, रस्त्यांची दुरवस्थेमुळे नाहक प्राण गमावावे लागल्याने लोकप्रतिनिधींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांसाठी मंगळवार, 7 रोजी दुपारी दोन वाजता यावल नाक्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिली. सोमवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परीषद घेतली. हे आंदोलन राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना व जनआधार विकास पार्टीच्या माध्यमातून होत असल्याचेही माजी आमदार म्हणाले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी कृउबा समितीचे सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, आऊं चौधरी, अनिता खरारे, बुटासिंग चितोडीया, युवराज पाटील, प्रकाश निकम, रवींद्र निकम, मुन्ना सोनवणे आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.