वाळू माफियांवर कठोर कारवाईसाठी तहसील प्रशासनाला साकडे

रावेर : डंपरद्वारे अवैध वाळू वाहतूक करणार्याने दसनूरच्या उपसरपंचाला मारहाण केल्याने मुजोर वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी दसनूरच्या सुमारे 100 शेतकर्यांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयात धडक देत प्रशासनाला कठोर कारवाईसाठी साकडे घाते. सुकी नदी पत्रातून अवैधपणे डंपरद्वारे वाळू वाहतूक करणार्या ज्ञानेश्वर लोणारी (चाले), कुणाल लोणारी, शुभम लोणारी व संगम कुटे यांनी दसनुरचे उपसरपंच सचिन गोविंदा पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अवैधपणे वाळू वाहतूक करणार्या व शासनाचा महसूल बुडविणार्या वाळू माफियांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली.
शंभर शेतकर्यांची उपस्थिती
प्राणघातक हल्ला कारवाई करण्याची मागणी शेतकर्यांनी करीत मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, दसनूरचे उपसरपंच साचील पाटील, महेश चौधरी यांच्यासह सुमारे 100 शेतकरी उपस्थित होते.


