नंदुरबार जि.प.निवडणूक : के.सी.पाडवी यांच्या पत्नी पराभूत

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी.पाडवी यांना धक्का बसला असून त्यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा पराभव झाला आहे. राज्य मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री आणि नंदुरबारमधील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेल्या के.सी. पाडवी यांना त्यांच्या तोरणमाळ या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. शिवसेना उमेदवार गणेश पराडगे यांनी हेमलता पाडवी यांना पराभूत केले आहे. पाडवींचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतविभागणी होऊन त्याचा फायदा शिवसेना उमेदवाराला झाल्याचे राजकीय गोटातून बोलले जात आहे.


