उधारीच्या पैशातून शिरपूरात तरुणाचा खून : चौघे संशयित पसार


Murder of youth in Shirpur due to borrowed money : Four suspects released शिरपूर : दारूची उधारी वाढल्यानंतर त्यातून वाढलेल्या वादानंतर शहरातील तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली व त्यातून तरुणाचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. राजू सुदाम कोळी (32, रा.वाल्मीकनगर, शिरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मारहाणीत झाला तरुणाचा मृत्यू
मयताचा भाऊ राकेश सुदाम कोळी (23, रा.वाल्मीकनगर, शिरपूर) याच्या तक्रारीनुसार, त्याचा भाऊ राजू याला दारूचे व्यसन होते त्यामुळे तो किस्मतनगर येथे दारू पिण्यासाठी जात होता. दारूच्या उधारीच्या पैशांमुळे तीन दिवसांपूर्वी त्याचे भांडण झाले व संशयितांनी त्याला शिविगाळ करीत हाता-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पुन्हा रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास राजू हा दारू पिण्यासाठी किस्मतनगर येथे गेला असता सुंदरवाडी रोडवर चार जणांनी अडवत पुन्हा बेदम मारहाण केली. या घटनेत तरुणाच्या डोक्याला, पाठीला, पोटाला आणि तोंडावर गंभीर दुखापत झाली. मारहाण होत असल्याचे लक्षात येताच त्याला त्याच्या भावांनी सोडविले.

झोपेतच झाला मृत्यू
राजू याला गंभीर अवस्थेत घरी आणण्यात आले. त्याच्या कानातून रक्तस्त्राव होवून डोळादेखील सुजला मात्र त्यानंतर तरुण न उठल्याने त्यास कॉटेज हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले असता डॉ.दिव्या तवर यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सोमवारी दुपारी चार वाजता चौघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !