शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई : मोबाईल टॉवरच्या साहित्याआडून पकडली 24 लाखांची सुगंधी तंबाखू
Big operation of Shirpur police : 24 lakh worth of snuff tobacco seized from mobile tower materials शिरपूर : शिरपूर तालुक्यात गुटखा जप्तीच्या कारवाईला 24 तास होत नाही तोच शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे आयशर वाहनातून तब्बल 24 ताख रुपये किंमतीची व राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. हरीयाणातील आयशर चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून या माध्यमातून गुटखा तस्करांची टोळी उजेडात येण्याची शक्यता आहे. ही कारवाई शिरपूर शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास केली.
मोबाईल टॉवरच्या मालाआड तंबाखूची तस्करी
शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चोपडा फाटा कळमसरे शिवारात बुधवारी दुपारी सापळा रचला. आयशर (क्र.एच.आर.46 ई.1969) आल्यानंतर त्यात मोबाईल टॉवरसाठी लागणार्या साहित्याच्या आड सुगंधी तंबाखूची तस्करी होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तब्बल 24 लाख रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. आयशर चालक अशोक आजादसिंग बडख (34, रा.बाळंद, ता.जि.रोहतक, हरीयाणा) यास अटक करण्यात आली असून 24 लाख रुपये किेंमतीची सुगंधी तंबाखू व 20 लाख रुपये किंमतीचा आशयर जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी शिरपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपअधीक्षक तथा पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर, उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप मुरकुटे, डी.बी. पथकातील हवालदार ललीत पाटील, लादुराम चौधरी, मनोज पाटील, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, प्रवीण गोसावी, सचिन वाघ, भटु साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी आदींच्या पथकाने केली.