भूईमूगाच्या पिकाआड फुलवली गांजा शेती : शिरपूर पोलिसांच्या कारावाईत 293 किलो ओला गांजा जप्त
Ganja farming flourished behind groundnut crop : Shirpur police seized 293 kg of wet ganja शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नटवाडे शिवारातील गांजा शेतीवर कारवाई करीत 293 किलो वजनाची ओल्या गांज्याची झाडे जप्त करीत एकाविरोधात गुन्हा दाखल केला तर संशयित पथक येताच पसार झाला. ही कारवाई मंगळवार, 2 मे रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईने गांजा शेती करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवररून कारवाई
शिरपूरचे निरीक्षक ए.एस.आगरकर यांना गांजा शेतीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. नटवाडे शिवारातील संशयित हरचंद जोगी पावरा (नटवाडे, ता.शिरपूर) याने भूईमूगाच्या पिकाआड गांजा शेती फुलवल्याचे उघडकीस आल्यानंतर पथकाने कारवाई करीत पाच लाख 86 हजार 600 रुपये किंमतीचा 293.300 ग्रॅम ओल्याची गांज्याची झाडे जप्त केली. ही कारवाई धुळे अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर निरीक्षक ए.एस.आगरकर, उपनिरीक्षक किरण बार्हे, उपनिरीक्षक गणेश कुटे, ललित पाटील, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मुकेश पावरा, प्रवीण गोसावी, सचिन वाघ, भटू साळुंखे, उमाकांत वाघ, होमगार्ड मिथून पवार, चेतन भावसार, शरद पारधी, राम भील, भाऊसाहेब ठाकूर आदींच्या पथकाने केली.