गावात वातावरण खराब असल्याचे घाबरवत जामनेरातून शेतकर्‍याची 60 हजारांची अंगठी लांबवली


Jamnerat engaged the farmer in talking and extended a ten gram ring जामनेर : गावात वातावरण खराब असून आम्ही शासकीय अधिकारी आहोत, तुमच्या हातातील अंगठी काढून द्या, आम्ही ती रूमालाल बांधून तुमच्या खिशात ठेवतो म्हणत 25 ते 30 वयोगटातील दोन भामट्यांनी शहरातील वयोवृद्ध शेतकर्‍याची सुमारे 60 हजार रुपये किंमतीची अंगठी लांबवली. या प्रकरणी जामनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोलण्यात गुंतवून फसवणूक
श्रीराम बाबूराव चौधरी (40, दत्तचैतन्य नगर, जामनेर) यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास शहरातील पाचोरा रोडवरील वर्धमान अ‍ॅक्वा दुकानासमोर त्यांचे वडिल बाबूराव चौधरी यांना 25 ते 30 वयोगटातील पांढरा रंगाचा शर्ट व पँट परीधान केलेल्या संशयितांनी अडवत आम्ही शासकीय कर्मचारी असून गावात वातावरण खराब झाले आहे, तुम्ही हातातील अंगठी काढून द्या, ती आम्ही रूमालात ठेवून खिशात ठेवून देतो म्हणून बोलण्यात गुंतवून दहा ग्रॅमची अंगठी लांबवली. काही वेळेनंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जामनेर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. तपास निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयेंद्र पगारे करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !