प्रकाशानजीक भीषण अपघातात तिघे ठार : दोघे गंभीर


Three killed in horrific accident near Prakasha : Two seriously प्रकाशा : भरधाव ट्रक व मिनी ट्रकमध्ये समोरा-समोर जोरदार धडक होवून झालेल्या अपघातात मध्यप्रदेशातील तिघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शहादा तालुक्यातील विसरवाडी-सेंधवा या राष्ट्रीय महामार्गावर प्रकाशा गावालगत रविवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात मिनी ट्रकमधील हेमराज अंजने (39), मनोज घाट्या (42, दोघे रा.सुरत) व भगवान भाई गोविंद पंचुले (48, गोंदिया, मध्यप्रदेश) हे जागीच ठार झाले. अपघातातील दोघा जखमींवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात मिनी ट्रकचा चक्काचूर
गुजरात राज्यातून मध्यप्रदेशकडे जाणारा ट्रक (जी.जे.5 बी.एक्स.4483) व मिनी ट्रक (एम.पी.09 एच.एच.5511) मध्य प्रदेशातून गुजरात राज्यात लग्न समारंभासाठी लागणारे साहित्य व धान्य घेऊन जात होता. प्रकाशा जवळ पहाटे समोरून ने त्यास समोरून जोरदार धडक दिली. त्यात मिनी ट्रकमधील तीन जागीच ठार झाले तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात मिनी ट्रकचा चक्काचूर झाला तर त्यातील लग्नासाठीचे साहित्य रस्त्यावर आले. प्रकाशा पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच जेसीबी यंत्राच्या साह्याने ट्रकमध्ये अडकलेल्या मिनी ट्रकला बाहेर काढले.

अपघातस्थळी रक्ताचा सडा
अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. मिनी ट्रकमधील सर्व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले तर अपघातात मिनी ट्रकमधील हेमराज अंजने (39), मनोज घाट्या (42, दोघे रा.सुरत) व भगवान भाई गोविंद पंचुले (48, गोंदिया, मध्यप्रदेश) हे जागीच ठार झाले तर मिनी ट्रक चालक गोलूभाई व अनिकेत अंतिम (दोघे रा.हिरापूर, मध्यप्रदेश) यांना नंदुरबार उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवले. जखमींना मदत करण्यासाठी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे संदीप खंदारे व रामा वळवी, माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, स्थानिक पत्रकारांसह ग्रामस्थांनी मदत केली. अपघाताला कारणीभूत ठरलेले ट्रक चालक व क्लीनर पसार झाले आहेत.

 


कॉपी करू नका.