धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत सहा महिन्यांच्या चिमुकल्यांचा मृत्यू
Six month old babies died in different incidents in Dhule district धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू ओढवला. पहिल्या घटनेत वरखेडी, ता.धुळे येथे झोक्यातून पडल्याने तर शिरपूर येथे झोपेत असताना सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धुळे तालुक्यातील वरखेडी येथे खालची भिलाटी भागातील जितू सोनवणे यांची सहा महिन्याची मुलगी परी जितू सोनवणे ही घरात झोक्यामध्ये झोपली असताना झोक्याची दोरी तुटताच तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची घटना सोमवार, 8 मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. तिला खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.दिव्या गवळी यांनी बालिकेला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देवरे करीत आहे.
शिरपूरात बालकाचा झोपेतच मृत्यू
शिरपूर शहरातील क्रांती नगरातील सहा महिन्यांचा बालकाचा झोपेतच मृतयू झाला. मंगळवार, 9 रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास सुदर्शन रमेश सोनार (वय सहा महिने) हा बालक घरातील पलंगावर झोपलेला असतांना त्याचे वडील रमेश सोनार हे त्यास पाहण्यासाठी गेले असता तो काहीएक हालचाल करीत नसल्याने लागलीच बालकाला इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले व तेथून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ अमोल जैन यांनी तपासून मृत घोषित केले़ याबाबत शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.