नांगरटी करतांना ट्रॅक्टर विहिरीत कोसळून चालकाचा मृत्यू
The driver died when the tractor fell into a well while ploughing शिरपूर : शेतातील कोरड्या असलेल्या उघड्या विहिरीत नांगरसह ट्रॅक्टर कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शिरपूर तालुक्यातील भटाणे शिवारात बुधवारी पहाटे घडली. सुरेश कुवरसिंग पावरा (19, रा.चिचपाणी, ता.शिरपूर, जि.धुळे, ह.मु.भटाणे, ता.शिरपूर) असे मयत चालकाचे नाव आहे.
मशागतीदरम्यान दुर्घटना
शिरपूर तालुक्यात शेतात खरीप हंगामाची पूर्व मशागत करण्याासाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. यांत्रिक यंत्राद्वारे मशागत केली जात असून बुधवारी रात्री तालुक्यातील भटाणे शिवारात महेंद्र जगतसिंग गिरासे यांच्या शेतात रात्री सुरेश पावरा ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करीत असताना साडेतीन वाजेच्या सुमारास शेतातील कोरडया असलेल्या उघड्या विहिरीत ट्रॅक्टर कोसळल्याने या अपघात चालक पावरा यास डोक्यास, दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. शेत मालक महेंद्र जगतसिंग गिरासे यानी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.अमोल जैन तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी वॉर्डबॉय नितेश रामा गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार मनोज साठे करीत आहे.