शिंदखेडा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Abuse of a minor girl in Shindkheda taluka शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील एका गावात रोजगारानिमित्त आलेल्या परीवारातील चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही बाब पालकांना समजल्यानंतर नरडाणा पोलीस ठाण्यात एका नराधमाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीविरोधात गुन्हा
शिरपूर तालुक्यातील एका गावातील परीवार रोजगारानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. या परीवारातील चार वर्षांच्या बालिकेला विश्वासात घेऊन काहीतरी फूस लावत नराधमाने घरी कोणीही नसल्याची संधी साधून त्या बालिकेला नदीच्या पलीकडे झाडाझुडपात नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित बालिकेला सोडून दिल्यानंतर बालिका रडतच घरी आली. व तिने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. पालकांनी नरडाणा पोलीस ठाणे गाठून नराधमविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कुंवर करीत आहेत.