कडगाव येथील अंगणवाडीवरील 15 हजारांचे सोलर पॅनल लांबवले

Theft of 15 thousand worth of solar panels : incident in Kadgaon जळगाव : जळगाव तालुक्यातील कडगाव गावातील अंगणवाडी क्रमांक 214 वरील 15 हजार रुपये किंमतीच्या सोलर पॅनलची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी शनिवारी नशिराबाद पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
अंगणवाडी सेविका चित्रा रमेश चौधरी (35, कडगाव) यांच्या फिर्यादीनुसार 11 ते 12 मे च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी अंगणवाडीच्या छतावर बसविलेले काळ्या रंगाचे चार बाय आठ लांबी रुंदीचे सोलर पॅनल लांबवले. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक सुनीता मधुकर लेले करीत आहेत.


