भुसावळ विभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी विक्रांत गायकवाड ; सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर उपअधीक्षकपदी बदली


Vikrant Gaikwad as new Deputy Superintendent of Police of Bhusawal Division; Somnath Waghchoure transferred as Deputy Superintendent Sangamner भुसावळ : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या राज्यातील पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांना गृह विभागाला अखेर मुहूर्त गवसला आहे. राज्यातील 140 हून अधिक पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील गोपाल बोरसे यांनी सोमवारी रात्री उशिरा काढले. त्यात भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर, जि.अहमदनगर पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी धर्माबाद, जि.नांदेड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड भुसावळ विभागात बदलून येत आहेत.

अत्यंत शिस्तप्रिय अधिकार्‍याच्या बदलीने भुसावळकरांना धक्का
भुसावळ विभागातील सुमारे दोन वर्षांपूर्वी धुरा घेतलेल्या सोमनाथ वाघचौरे यांच्या बदलीने भुसावळकरांना मोठा धक्का बसला आहे. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या वाघचौरे यांनी त्यांच्या कार्यशाळात शहरातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले शिवाय गुन्हेागारी डाटा एका क्लिकवर उपलब्ध करण्याची संकल्पना कौस्तुकास्पद राहिली. अत्यंत बारकाईने केलेल्या तपासामुळे अनेक खुनांचा उलगडा होवून आरोपी कोठडीत गेले तर स्थानबद्धतेसह हद्दपारीच्या कारवायादेखील वाघचौरे यांच्या काळात सर्वाधिक राहिल्या.

खान्देशातील बदली झालेले अधिकारी असे

नंदुरबार उपअधीक्षक सचिन प्रकाश हिरे यांची शिरपूर पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली असून पिंप्रीचिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औदुंबर डिस्ले हे नंदुरबार पोलीस उपअधीक्षकपदी बदलून येत आहेत.

गडचांदूर, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार काशीबाराव नायक यांची जळगाव शहर पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे.

धुळे जातपडताळणी समितीचे राजकुमार शंकर शिंदे यांची मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

साक्री उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप भिवसेन मैराळे यांची नाशिक महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली.

अमळनेर पोलीस उपअधीक्षक राकेश रावसाहेब जाधव यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली.

जळगाव मुख्यालयातील संदीप रघुनाथ गावीत यांची पाचोरा उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे भास्कर प्रभाकर डेरे यांची पिंपरी-चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली.

सेवाज्येष्ठनेनुसार मिळालेली पदोन्नतीनुसार बदल्या अशा
जळगावचे बाबासाहेब बाजीराव ठोंबे यांची नाशिक गुप्तचर प्रशिक्षण संस्थेत उपअधीक्षकपदी तर दिलीप पांडुरंग भागवत यांची उदगीर, जि.लातूर येथे पोली उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली. रामराव माधवराव सोमवंशी यांना साक्री उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी तर साजन रुपलाल सोनावणे यांची अक्कलकुवा पोलीस उपअधीक्षकपदी सेवाज्येष्ठतेनुसार बदली करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.