कोळवदला कामाच्या पैशाच्या हिशोबावरून वाद : कारची तोडफोड ; त्रिकूटाविरोधात गुन्हा


Argument over account of work money to Kolwad : car vandalized; A crime against the trio यावल : तालुक्यातील कोळवद या गावात कामाच्या पैशाच्या हिशोब घेण्याच्या कारणावरून तिघांनी 31 वर्षीय इसमाला शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली व त्याच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने गुप्ती, लोखंडी रोड, चॉपर घेऊन अंगावर धावून आले. दरम्यान संबंधिताने दरवाजा बंद करून घेतल्याने तिघांनी त्याच्या घराबाहेर लावलेल्या कारचे काचा फोडून नुकसान केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणी तीन जणाविरुद्ध आर्म ऍक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा
कोळवद, ता.यावल येथील प्रवीण विठ्ठलराव सूर्यवंशी (31) यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरी त्यांचा भाचा कुणाल भानुदास सोनवणे, भानुदास चिंतामण सोनवणे (दोघे रा.बामणोद, ता.यावल) व मिलिंद यशवंत कोळी (रा.हरी विठ्ठल नगर, जळगाव) हे तिघे कामाचा हिशोब घेण्यासाठी आले असता सूर्यवंशी यांनी सांगितले की, माझं दुसरं काम सुरू आहे ते आटोपले की, आपण आपल्या कामाचा हिशोब करू. याचा राग येऊन या तिघांनी त्यांना शिवीगाळ केली व त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने गुप्ती, लोखंडी रॉड, चॉपर घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले.

दरवाजा बंद केल्याने अनर्थ टळला
दरम्यान, सूर्यवंशी यांनी आपल्या घराचा लोखंडी दरवाजा बंद करून घेतला. संशयितानी शिवीगाळ केली आणि घराबाहेर लावलेली त्यांची कार (क्रमांक एम.एच. 02 व्ही.आर. 1323) हिचे काच फोडून नुकसान केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळ, पोलीस नाईक राजेंद्र पवार करीत आहे.


कॉपी करू नका.