तळोदा तालुक्यात भीषण अपघात : चौघे ठार, दोघे गंभीर


Fatal accident in Taloda Taluka : Four killed, two seriously तळोदा : घाटातील तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर पिकअप वाहन दरीत कोसळल्याने झालेल्या अपघात चौघे जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात धडगाव-तळोदा रस्त्यावर चांदसैली घाटात मंगळवारी दुपारी घडला. अपघातात अन्य तिघे जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घरासाठी लागणारे कौल आणि पत्रे घेण्यासाठी पिकअपने (क्र. एमएच 43 एडी 1818) तळोदा येथे येत असताना तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटताच पिकअप दरीत कोसळली. दरम्यान, अपघातात मयत झालेले चौघे हे एकाच कुटूंबातील कर्ते होते व त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात आली.

चौघांचा जागीच मृत्यू
चांदसैली घाटात पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने वाहन (एम.एच.43 ए.डी.1818) ही घाटातील पहिल्या वळणावरून थेट तिसर्‍या वळणावर दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात तुकाराम दिवल्या ठाकरे (35, वावी, ता.धडगाव), वीरसिंग रमेश पावरा (35, बोदला, ता.भडगाव), अमरसिंग शंकर ठाकरे (35) व मुकेश तेजला ठाकरे (22, दोन्ही रा.वावी, ता.भडगाव) यांचा जागीच मृत्यू झाला तर स्वरूपसिंग ठाकरे, गणेश ठाकरे, वसंत साकर्‍या ठाकरे हे गंभीर जखमी झाले.


कॉपी करू नका.