बैलगाडीवर दुचाकी आदळल्याने आडगावातील तरुणाचा मृत्यू

A young man from Adgaon died after his bike collided with a bullock cart एरंडोल : भरधाव दुचाकी बैलगाडीवर आदळून झालेल्या अपघातात आडगावातील 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात आडगाव येथे मंगळवार, 23 रोजी रात्री 10 वाजता घडला. सागर रघुनाथ माळी (29) असे मयताचे नाव आहे.
भरधाव दुचाकी बैलगाडीवर आदळली
सागर हा तरुण मित्रासह शिवाजी नगराकडे निघाला असता कासोदा रस्त्यावर बैलगाडीवर दुचाकी आदळल्याने सागरच्या छातीला जोरात मार लागल्याने बेशुद्धावस्थत एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात दिल्यानंतर बुधवार, 24 रोजी सकाळी 11 वाजता शोकाकुल वातावरणात तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परीवार आहे. सेवानिवृत्त पोस्टमन रघुनाथ नागो माळी यांचा सागर हा मुलगा होय.


