यावलच्या लाचखोर लेखापालास दोन दिवसांची पोलीस कोठडी


Yaval’s bribe-taking accountant remanded to two-day police custody यावल : भोजन ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी 20 हजाराची लाच घेतांना यावल येथील आदिवासी कार्यालयातील लेखापासास शुक्रवारी दुपारी चार वाजता अटक करण्यात आली. संशयिताला शनिवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

भोजन ठेकेदाराकडून घेतली लाच
यावल शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लेखापाल रवींद्र बी.जोशी यांना 20 हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली होती. संशयितास शनिवारी भुसावळ अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय, भुसावळ येथे हजर केले असता संबंधीत लेखापाल जोशी यांनी आणखी कुणाकडून लाच मागितली वा अडवणू केली शिवाय या गुन्ह्यात आणखी काहींचा सहभाग आहे का ? याबाबत चौकशी करण्यासाठी एसीबीने पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी युक्तीवाद केला. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !