ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क व्हा : यावल शहरातील तरुणाला ऑनलाईन एक लाख 33 हजारांचा गंडा


One lakh 33 thousand ganda online to the youth of Yaval City यावल : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या असताना आता भामट्याने युपीआय क्रमांक शोधून शहरातील 27 वर्षीय तरुणाला चुना लावला. अज्ञात मोबाईल धारकाने ऑनलाईनरीत्या तरुणाच्या खात्यातून परस्पर रक्कम ट्रांजेक्शन करून एक लाख 33 हजारात फसवणूक केली. हा प्रकार तरुणाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

युपीआय क्रमांक वापरत फसवणूक
यावल शहरातील बारीवाडा भागातील रहिवासी योगेश नामदेव वारुळकर या तरुणाला ईकबाल हुसेन नामक एका व्यक्तीच्या मोबाईलवरून कॉल आला व त्या संबंधित व्यक्तीने त्यांचा युपीआयचा क्रमांक वापरून त्यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया अशा दोन्ही बँकेच्या खात्यातून वेळोवेळी तब्बल एक लाख 33 हजार रुपये काढून घेतले आणि त्यांची फसवणूक केली. हा प्रकार तरुणाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठले व याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात इकबाल हुसेन नामक तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर करीत आहे.


कॉपी करू नका.