अश्लील व्हिडिओ व्हायरल : प्रियकराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या


नागपूर : तो आणि ती एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले, दोघांनी लग्नाची तयारी केली मात्र घरच्यांच्या विरोधामुळे लग्न होवू न शकल्याने दोघांनी विवाह उरकले मात्र तो कामानिमित्त रायपूरात गेला व विवाहित प्रेयसीला त्याने बोलावल्यानंतर एका हॉटेलमध्ये शारीरीक संबंध ठेवले मात्र यावेळी विवाहित प्रियकराने या संबंधाची क्लीप बनवली. काही दिवसांनी पत्नीने ही क्लीप पाहून आकांडतांडव करीत त्या विवाहित प्रेयसीचा शोध घेत झपाई केली तर इतक्यावर पत्नी न थांबता तिने एका सोशल मिडीयातील ग्रुपवर क्लीप टाकल्यानंतर ती तुफान व्हायरल झाली. विवाहित प्रेयसीच्या भावाला ही बाब कळताच त्याने बहिणीच्या प्रियकराला जाब विचारत त्याची दगड टाकून हत्या केली. ही घटना मंगळवारी भरदुपारी ही थरारक घटना गिट्टीखदानमध्ये घडली. या घटनेत कपिल डोंगरे (37, गंगानगर, गिट्टीखदान) या तरुणाचा मृत्यू झाला.

पत्नीच्या हाती मोबाईल पडताच वादंग
काही दिवसांपूर्वी कपीलला दुसर्‍याच तरुणीसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर (अश्लील चित्रफित) कपिलची पत्नी संतापली. त्यावरून पती-पत्नीत खटके उडू लागले. कपिलकडून नंबर घेऊन पत्नीने त्या तरुणीला फोन लावून तिची खरडपट्टी काढली. नातेवाईकांनीप्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. तिने पतीच्या मोबाईलमधून प्रेयसीसोबतचे काही अश्लील छायाचित्र आणि चित्रफीती काढल्या आणि वस्तीतील ओळखीच्या व्यक्तींच्या एका व्हॉट्सअप ग्रूपवर त्या व्हायरल केल्या त्यामुळे त्या तरुणीसोबत तिच्या कुटुंबिुयांचीही वस्तीत बदनामी झाली. हा प्रकार असह्य झाल्याने तरुणीच्या भावाने कपिलला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि तरुणाने मंगळवारी दुपारी आधी कपिलवर लाकडी दांड्याने हल्ला चढवला नंतर त्याला दगडाने ठेचून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलिसात हजर झाला.


कॉपी करू नका.