किनगावात जुना वाद उफाळला : तरुणीवर हल्ला करणार्‍या पाच संशयितांविरोधात गुन्हा


An old controversy erupts in Kingaon : A case against five suspects who assaulted a young woman यावल : तालुक्यातील किनगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका 20 वर्षीय तरुणीला पाच जणांनी मिळून लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली तसेच शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच संशयितांविरोधात गुन्हा
किनगाव, ता.यावल या गावातील आरती दिलीप जाधव (20) या तरुणीने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित प्रल्हाद बाबुराव जाधव, सुनील प्रल्हाद जाधव, अलका सुनील जाधव, उषा उखा जाधव व रवींद्र ओमकार गायकवाड (सर्व रा.किनगाव बुद्रुक) या पाच जणांनी या तरुणीला तिच्या घरी येऊन लाठ्या-कट्यांनी दगडाने तिला मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. यात तरुणी जखमी झाली. या प्रकरणी यावल पोलिसांना पाच जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.