यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात दोघे चिमुकले बुडाले

एकाचा मृतदेहच लागला हाती तर दुसर्‍याचा रात्री उशिरापर्यंत शोध


Two toddlers drowned in Nimbadevi dam in Yaval taluka यावल : गुरांना पाणी पाजण्यासाठी यावल तालुक्यातील सावखेडासीम गावाजवळील निंबादेवी धरणावर आलेले निमछावी वस्तीवरील दोघे बालक अचानक बुडाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर एकाचा मृतदेह शोधण्यात यश आले तर दुसर्‍या बालकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. दोन्ही बालके निमछाव आदिवासी वस्तीवरील रहिवासी आहेत. आसाराम शांतीलाल बारेला (14) व नेनू किसन बारेला (10, रा.निमछाव वस्ती) अशी बुडालेल्या बालकांची नावे आहेत. आसारामचा मृतदेह शोधण्यात यश आले मात्र नेनूचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही.

पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
सूत्रांच्या माहितीनुसार, सावखेडासीमजवळील निंबादेवी धरणावर मंगळवारी सायंकाळी गुरे चारण्याकरीता निमछाव आदिवासी वस्तीवरील ही बालके आली व धरणाच्या पाण्यात ती उरतल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व दोघे धरणात बुडाली. नागरीकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर सावखेडासीम पोलीस पाटील पंकज बडगुजर यांना माहिती देण्यात आली. अंधार होण्यापूर्वी धरणातून आसाराम शांतीलाल बारेला या बालकाचा मृतदेह काढण्यात आला मात्र नेनू बारेला या बालिकेचा मृतदेह हाती आला नाही. रात्री उशीरापर्यंत धरण परीसरात शोध मोहिम सुरू होती.


कॉपी करू नका.