शिक्षणाच्या नावाखाली चिमुकल्यांंची तस्करी : भुसावळसह मनमाडमध्ये 59 बालकांची सुटका ; पाच अटकेत


Trafficking of children in the name of education :59 children rescued in Bhusawal and Manmad; Five arrested भुसावळ : शिक्षण घेण्याच्या नावाखाली बिहार राज्यातील गरीब कुटूंबातील अल्पवयीन मुलांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भुसावळात 29 तर मनमाडमध्ये 30 मुलांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात भादंवि 370 अन्वये ह्युमन ट्रॅफिकींगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यंत्रणेकडून या गंभीर प्रकाराची दखल घेण्यात आली असून संशयिताची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ट्वीट होताच दानापूर-पुणे एक्सप्रेसमध्ये कारवाई
दानापूर-पुणे एक्सप्रेसने लहान मुलांची तस्करी होत असल्याचा संशय एका वकीलाने व्यक्त करीत रेल्वे बोर्डाला ट्वीट केले व सुरक्षा यंत्रणांना त्याबाबत संदेश मिळताच भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी दुपारी 3.6 वाजता 29 मुलांची सुटका केली तर एकाला ताब्यात घेतले. चिमुकले घाबरू नये म्हणून सुरक्षा यंत्रणा गाडीतूनच मनमाडपर्यंत गेली व तेथे 30 मुलांची सुटका करीत चौघांना अटक करण्यात आली.

अधिकारी म्हणाले- पालकांचा शोध सुरू
मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांकडून मिळाली आहे.

 


कॉपी करू नका.