रावेरात हाणामारी होताना पोलीस धडकले ; कारवाईत पिस्टल व जिवंत काडतूसांसह कुविख्यात गुन्हेगाराला बेड्या


During the scuffle in Raver, the police struck ; Notorious criminals with pistols and live cartridges in action रावेर : रावेर-बर्‍हाणपूर रस्त्यावरील अटवाडा फाट्याजवळ तीन जण आपसात मारामारी करीत असताना रावेर पोलिसांनी धाव घेत एका संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस सापडल्याने संशयितास अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी सव्वा सवात वाजता करण्यात आली. मुजाहिद खान इब्राहीन खान (27, मदिना मशीद, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्यासोबतचे दोघे संशयित पसार झाले आहेत.

गोपनी माहितीवरून कारवाई
रावेचे निरीक्षक निरीक्षक कैलास नागरे यांना रावेर-बर्‍हाणपूर रस्त्यावरील अटवाडा फाट्याजवळ हाणामारी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, कर्मचारी सचिन घुगे, विखार शेख, प्रदीप पाटील, सुकेश तडवी यांना पाठवण्यात आले. यावेळी हाणामारी होत असताना पोलीस येताच दोन संशयित पसार केळी बागेत पसार झाले तर मुजाहिद खान याला पकडण्यात आले. आरोपीच्या कमरेला तीन जिवंत काडतूस लोड केलेले गावठी बनावटीचे 28 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल आढळल्याने ते जप्त करण्यात आले.





संशयितावर रुग्णालयात उपचार
हाणामारीत मुजाहिद हा जखमी झाल्याने त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहते. संशय्यित सराईत गुन्हेगार असून विविध पोलिस ठाण्यात त्याच्या विरूद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नागरे यांनी दिली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !