धुळ्यात तलवारीच्या धाकावर दहशत : अल्पवयीन ताब्यात
Terror at the point of a sword in the dust : Juvenile custody धुळे : अल्पवयीन मुलाला तलवारीसह पकडण्यात आले. ही कारवाई धुळे गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दुपारी केली. शहरातील अंबिका नगर परिसरात हनुमान मंदिराजवळ अल्पवयीन तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाला रवाना करीत संशयिताला ताब्यात घेतले.
चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा
याप्रकरणी पोलिस कर्मचारी योगेश साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिसात शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक एन. जे. देवरे घटनेचा तपास करीत आहेत.