दिड हजारांची लाच भोवली : जामन्यापाडा ग्रामसेवक धुळे एसीबीच्या जाळ्यात
Bribe of 15000 rupees : Jamnyapada gram sevak Dhule in ACB’s net धुळे : जन्माची नोंद करण्यासाठी एक हजार चारशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यास कार्यालयातच धुळे एसीबीने मंगळवारी दुपारी चार वाजता पकडल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. तक्रारदार हे जामन्यापाडाचे रहिवासी असून त्यांच्या आत्याची जन्मनोंद नसल्याने शिरपूर न्यायालयात त्यांनी प्रकरण दाखल केल्यानंतर न्यायालयाने जन्म नोंद करण्याबाबत 14 ऑक्टोबर 2022 रोजी आदेश दिले होते. तक्रारदाराने 16 मे 2023 रोजी कागदपत्रे सादर केल्यानंतर लेट फिच्या नावाखाली एक हजार चारशे रुपये लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली . मंगळवारी लाच पडताळणीअंती सापळा रचून संशयित ग्रामसेवकास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक प्रकाश झोडगे, निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदीच्या पथकाने केली.