यावल शहरातील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारातून दुचाकी लांबवली

A two-wheeler was recovered from the premises of the tribal project office in Yaval city यावल : शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारात लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबवली. साकळी येथील एका जण कामानिमित्त यावल शहरात आला असता त्याने कार्यालयाच्या आवारात मोटरसायकल लावली असता अज्ञात चोरट्याने मोटरसायकल लांबवली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम
यावल शहरात आठवडे बाजार भागात आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालय आहे. या कार्यालयात सय्यद फारूक सय्यद उस्मान (साकळी) यांनी दुचाकी (एम.एच. 19 सी. एस. 9585) ही लावली असता काही वेळेत चोरट्यांनी संधी साधली. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळ, हवालदार संजय देवरे करीत आहे.
