धुळ्यातील टीपू सुलतान स्मारक अखेर हटवले !
Tipu Sultan memorial in Dhule finally removed ! धुळे : वादग्रस्त पोस्ट सोशल मिडीयात टाकण्यावरून राज्यात वातावरण पेटले असतानाच धुळ्यात मात्र अनधिकृतरीत्या टीपू सुलतान स्मारकाची उभारणी करण्यात आली.. याबाबत भाजपने मनपाकडे तक्रार करीत हा पुतळा हटवण्याची मागणी केल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ही जागा कुणाची ? असा प्रश्न केला. त्यावर मनपा व बांधकाम विभागाने हात वर केल्यानंतर स्मारक हटवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांनीच गुरुवारी मध्यरात्री स्वत:हून तो काढून घेतला.
वरीष्ठ स्तरावर तक्रार
धुळ्यातील एका चौकात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे टीपू सुलतानचे स्मारक उभारण्यात आले. भाजपाच्या युवा मोर्चाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिली होती. याचबरोबर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, धुळे पालिकेलाही पत्र लिहून हे स्मारक हटविण्याची मागणी केली. तक्रारीनंतर अधिकार्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार टीपू सुल्तानच्या अनधिकृत स्मारकावर कारवाई करण्यापूर्वीच तणाव टाळण्यासाठी ज्यांनी स्मारकासाठी पुढाकार घेतला होताच त्यांनीच स्वत:हून पुतळा काढून घेतला.