प्रशांत सांगडे भुसावळचे नूतन तहसीलदार तर मुक्ताईनगर तहसीलदारपदी डी.एल.मुकुंदे

Prashant Sange is the new tehsildar of Bhusawal while DL Mukunde is the new tehsildar of Muktainagar भुसावळ : राज्यातील महसूल संवर्गातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार श्रेणीतील कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी सोमवार, 12 जून रोजी काढले आहेत. त्यात भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे यांची मालेगाव धान्य वितरण अधिकारीपदी तर मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांची त्र्यंबकेश्वर तहसीलदारपदी बदली करण्यात आली. संचेती यांच्या जागी नांदुरा तहसीलदार डी.एल.मुकुंदे बदलून येत आहेत तर भुसावळ तहसीलदारपदी नियुक्तीच्या प्रतीक्षेतील प्रशांत सांगडे बदलून येत आहेत.
महेश पवार नवापूरचे नूतन तहसीलदार
अन्य बदली झालेल्या अधिकार्यांमध्ये मालेगावचे धान्य वितरण अधिकारी दत्तात्रय शेजुळ यांची पिंपळनेर, ता.साक्री अपर तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेतील महेंद्र मोठाभाऊ सूर्यवंशी हे धरणगावचे नूतन तहसीलदार असतील तर नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांची चांदवड तहसीलदारपदी बदली करण्यात आली असून नियुक्तीच्या प्रतीक्षेतील महेश पवार यांची नवापूर तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.धुळे ग्रामीण तहसीलदार गायत्री सौंदाणे यांची पारनेर, ता.अहमदनगर तहसीलदारपदी बदली झाली असून त्यांच्या जागी जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे बदलून येत आहेत. दरम्यान, भुसावळसह मुक्ताईनगरात नवीन तहसीलदार कोण येणार ? याबाबत अद्याप आदेश काढण्यात आले नसून लवकरच त्याबाबत आदेश निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.