मावस भावानेच अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार  : अमळनेर तालुक्यातील प्रकार


A minor girl was raped by her maternal uncle: A case in Amalner taluka अमळनेर : अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तपासात धक्कादायक बाब समोर आली असून संशयित तरुणीच्या सख्ख्या मावशीचा मुलगाच निघाला असून त्याने तरुणीवर अत्याचारही केल्याचे स्पष्ट झाले आहे. मारवड पोलिसांनी मुलीच्या जवाबावरून धुळे जिल्ह्यातील चिंचवार येथील तरुणावर बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली.

पळवून नेत केला अत्याचार
अमळनेर तालुक्यातील एका गावातील मजूर महिलेच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले होते. 3 मार्च रोजी सकाळी सहा वाजेपूर्वी ती अचानक गायब झाल्याने मारवड पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी आणि अल्पवयीन तरुणी धुळे येथे एमआयडीसीमध्ये वास्तव्यास असल्याचे कळाले. मुलीला पळवून नेणारा धुळेतील तरूण हा मुलीचा मावसभाऊच असल्याचेही धक्कादायक माहिती समोर आली. पीडीत मुलीला त्याने 3 मार्च रोजी मोटरसायकलवरून पळवून नेले. महिला कॉन्स्टेबल आणि मारवड येथील प्रतिष्ठित महिलेच्या समक्ष अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आल्यानंतर तरुणाने अत्याचार केल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्ह्यात कलमाची वाढ करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !