शिरपूर शहरात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन
Police patrolling in Shirpur city on the background of festivals शिरपूर : आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी सणानिमित्त शिरपूर पोलीस दलातर्फे शहरातील विविध भागातून पथसंचलन करण्यात आले. शिरपूर शहर पोलीस स्टेशनपासून सायंकाळी पाच वाजता रूट मार्चला सुरूवात झाल्यानंतर मराठा गल्ली, कुंभार टेक, खालचे गाव, बौद्ध वाडा, तरणतारण मंदिर, बालाजी मंदिर, खालचे गाव पाच कंदील, कन्या हायस्कूलमार्गे रूट मार्च निघाल्यानंतर सायंकाळी शिरपूर पोलीस ठाण्याजवळ रूट मार्च आल्यानंतर त्याचा समारोप झाला.
यांचा पथसंचलनात सहभाग
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहरचे निरीक्षक ए.एस.असटकर यांच्या नेतृत्वात सहा एएसआय व 37 पोलीस कर्मचारी तसेच आरसीपीच्या कर्मचार्यांचा पथसंचलनात समावेश होता.