तापी नदीपात्रात एकाच दिवशी दोघांचे मृतदेह आढळले


Both bodies were found in Tapi river bed on the same day शिरपूर : तरुणासह प्रौढाचा एकाचवेळी तापी नदीपात्रात मृतदेह आढळल्याने शिरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज प्रेमसिंग राजपूत (24, रा.अहिल्यापुर) व अशोक नामदेव मराठे (47, रा.जनता नगर, शिरपूर) अशी मृतांची नपावे आहेत. या प्रकरणी उपजिल्हा रूग्णालयातील वॉर्डबॉयने खबर दिल्याने थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय
शिरपूर शहरातील जनता नगरमधील अशोक मराठे यांची शनिवारी सावळदे येथील तापी नदी पुलावर दुचाकी आढळल्यानंतर त्यांचा शनिवार व रविवारी या दोन्ही दिवशी नदी पात्रात त्याचा शोध घेण्यात आला. रविवारी त्यांचा नदी पात्रात पुलावरून शोध घेतला जात असतांना त्याचदरम्यान अहिल्यापुर येथील 24 वर्षीय राज प्रेमसिंग राजपूत याने पुलावरून उडी घेतल्यानंतर दोघांचा शोध सुरू असताना मृतदेहच हाती आले. आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.
होती. तेव्हापासून दोघांचा नदी पात्रात शोध घेतला जात होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !