यावल-चितोडा रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला जखमी


Elderly woman injured in two-wheeler collision on Yaval Chitoda road यावल : यावल-चितोडा रस्त्यावर महाविद्यालयाच्या पुढे एका 64 वर्षीय वृद्ध महिलेला भरधाव वेगात येणार्‍या दुचाकी चालकाने धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

पायी चालताना दुचाकीची धडक
चितोडा रस्त्यावर महाविद्यालयाच्या पुढे लिलाबाई सुका भील (64, बोरावल गेट, यावल) ही वृद्धा महिला शेती काम करून यावलकडे पायी येत असताना तिच्या मागून भरधाव वेगात एक अज्ञात दुचाकी चालक येत असताना पाठीमागून त्याने धडक दिल्याने लिलाबाई भिल यांच्या डोक्याला, हाताला, पायाला, कमरेला जबर दुखापत झाली. जखमी अवस्थेत तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले असता त्या ठिकाणी त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी मोहिनी भुगवाड्या, अधिपरीचारीका प्रियतमा पाटील, पिंटू बागुल आदींनी उपचार केले. महिलेला जबर दुखापत झाल्याने त्यांच्यावर यावल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !