शिरपूरातील चालकाला गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह पकडले : धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Shirpur driver nabbed with Gavathi katta and live cartridge : Dhule Local Crime Branch action धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा बाळगून असलेल्या व व्यवसायाने चालक असलेल्या संशयिताच्या मुसक्या बांधल्या आहेत. संशयितांकडून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. शनिवार, 24 रोजी ही कारवाई करण्यात आली. रवींद्र भगवान भील (रोहिणी, ता.शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी केली ही कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, दिलीप खोंडे, धनंजय मोरे, संदीप सरग, संतोष हिरे, प्रकाश सोनार, किशोर पाटील, मयूर पाटील, योगेश जगताप, चालक कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.