गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसांसह पुण्यातील युवक शिरपूर तालुका पोलिसांच्या जाळ्यात
Youth from Pune with Gavathi pistol and four Vijant cartridges in the net of Shirpur taluka police
धुळे : पुण्यातील युवकाला चार जिवंत काडतूस व गावठी कट्ट्यासह शिरपूर तालुका पोलिसांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे. खामखेडा गावाजवळ त्यास सांगवी पोलिसांनी त्यास रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. गोविंद मुलचंद सोलंकी (29, रा.वॉर्ड क्रमांक तीन, ग्रामपंचायत छापरी, पो.छोटा टिगरीया, ता.जि.देवास (मध्यप्रदेश), हल्ली मुक्काम अजिंठानगर, निगडी, पिंपरी-चिंचवड, पुणे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावाकडून सत्रासेन गावाकडे एक संशयित गावी कट्टे आणत असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाल्यानंतर पथकासह त्यांनी सापळा रचला. खामखेडा गावाच्या पुढे संशयित गोविंद मुलचंद सोलंकी (29, रा.वॉर्ड क्रमांक तीन, ग्रामपंचायत छापरी, पो.छोटा टिगरीया, ता.जि.देवास (मध्यप्रदेश) आल्यानंतर पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी कट्टा मॅगझीनसह व खिशात चार जिवंत काडतुसे मिळाल्याने एकूण 29 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे, संदीप पाटील, सागर ठाकूर, संदीप ठाकरे, संतोष पाटील, योगेश मोरे, प्रकाश भील, मुकेश पावरा व चालक मनोज पाटील आदींच्या पथकाने केली. तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.