A soldier of Shirpur died a heroic death in Sikkim शिरपूरच्या जवानाला सिक्कीममध्ये वीर मरण
A soldier of Shirpur died a heroic death in Sikkim शिरपूर : शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील मूळ रहिवासी व हल्ली सिक्कीम येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत जवानाला दरीत कोसळल्याने वीर मरण आले. ही घटना बुधवार, 5 जुलै रोजी रात्री घडली. मनोज संजय माळी (27) असे वीर मरण आलेल्या जवानाचे आहे.
चार वर्षांपूर्वीच सैन्य दलात दाखल
मनोज हे चार वर्षांपूर्वीच भारतीय सैन्य दलात दाखल झाले हातेे व सध्या सिक्कीमच्या गंगटोक येथे कार्यरत असताना त्यांचा पाय सरकल्याने ते दरीत कोसळले. वीर जवानाची परीस्थिती अत्यंत हालाखीची असून त्यांचे वडील शेतकरी तर मोठे भाऊ कंपनीत कामाला आहेत.