कुंडाणे वेल्हाणे येथील दाम्पत्याची गळफास घेत आत्महत्या


A couple in Kundane Velhane committed suicide by hanging themselves धुळे : तालुक्यातील कुंडाणे वेल्हाणे येथील दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने धुळे तालुक्यात खळबळ उडाली. जितेंद्र बाळू पाटील (30) व टिना (प्रतीक्षा) जितेंद्र पाटील (25) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे ठोस कारण कळू शकले नाही.

आत्महत्येनंतर भावाला पाठवला मेसेज
आत्महत्येपूर्वी जितेंद्र याने त्याच्या भावास आत्महत्या करीत असल्याबाबत मोबाईलवर संदेश पाठविला होता. संदेश पाहताच भावाने त्याच्या मित्रांना याबाबत माहिती देवून घरी जाण्यास सांगितले होते. मित्र घरी पोहचले तेव्हा दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मृत जितेंद्र व प्रतीक्षा या दोघांना दोन मुले आहेत. या घटनेमुळे कुंडाणे गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक विजया पवार, सुनील जावरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली तसेच पंचनामा करुन दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले. .

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !