हॉर्टीकल्चर कॉलेज आणि टिश्यू कल्चर पार्कबाबत हालचाली वेगात


फैजपूर : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या बैठकीत विद्यापीठातील शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाबाबत केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे येथे चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, संचालक, अधिष्ठाता, सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष, महासंचालक, संचालक आणि कृषी परीषदेचे सहसंचालक उपस्थित होते.

कुलगुरू पालसह खिरोदा व हिंगोण्यात करणार पाहणी
पालसह खिरोदा येथील हॉर्टीकल्चर कॉलेजच्या जागेची पाहणी आणि सीमांकन करण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि सर्व संचालक येणार आहेत. या संदर्भातील कामाला बैठकीने वेग आला आहे. हिंगोणा येथील जागेची पाहणीही यावेळी कुलगुरू करतील. हिंगोणा येथे टिश्यू कल्चर पार्क (कंद वर्गीय संशोधन केंद्र) आणि पाल-खिरोदा हॉर्टीकल्चर महाविद्यालय स्थापनेबाबतीतही लवकर कारवाई करण्याच्या सूचना जावळे यांनी दिल्या.

मुक्ताईनगरातील रीक्त जागा भरण्याच्या सूचना
मुक्ताईनगर येथील कृषी महाविद्यालयात रीक्त असलेल्या जागा तत्काळ भरण्याच्या सूचना संबंधीत अधिकारी यांना जावळे यांनी दिल्या. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढीसोबत उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने नवीन संशोधन, सुधारीत अवजारांची निर्मिती, पर्यावरण पूरक नवीन तण नाशक संशोधन आणि विद्यापीठाचे संशोधन शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचवावी, अश्या सूचना त्यांनी केल्या.


कॉपी करू नका.