खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाचे जळगावात लॅण्डींग : रस्ते मार्गाने धुळ्याकडे रवाना
Landing of Chief Minister’s plane in Jalgaon due to bad weather : Leave for Dhule by road जळगाव : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुंबईहून विमानाने धुळ्याकडे निघालेल्या मुख्यमंत्र्यांना खराब हवामानाचा फटका बसला. पायलटने जळगाव विमान तळावर लॅण्डींग केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे विमान सोमवारी दुपारी अडीच वाजता लॅण्डींग होताच त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. पंधरा मिनिटे मुख्यमंत्री जळगावातून थांबून होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
रस्ते मार्गाने मुख्यमंत्र्यांचा ताफा धुळ्याकडे
धुळ्यात दुपारी चार वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून विमानाने धुळ्याकडे निघाले होते मात्र खराब हवानामुळे त्यांचे विमान जळगावात लॅण्ड झाले. यावेळी 15 मिनिटानंतर मोटारीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळ्याकडे रवाना झाले. भर पावसात मुख्यमंत्र्यांचा ताफा धुळ्याकडे रवाना झाला तर अचानक आलेल्या दौर्यामुळे प्रशासनातील अधिकार्यांची धावपळ उडाली.