शिरपूरात कॅफेआड युगूलांचे अश्लील चाळे : कॅफे मालकाविरोधात गुन्हा
Indecent chale of couples at cafe in Shirpur : Crime against cafe owner शिरपूर : शहरातील करवंद नाका परीसरातील एका कॅफेत शिरपूर शहर पोलिसांनी अचानक धाड टाकत अश्लील चाळे करणार्या चौघांना ताब्यात घेत नंतर समज देवून सोडले तर याप्रकरणी कॅफे मालकावर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर शहरातील करवंद नाका परीसरातील सॉलीड कॅफेत अधिक पैसे आकारुन तरुण-तरुणींना जागा उपलब्ध करून देत आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्याची मुभा दिली जाते, अशी तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली होती. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील, गांगुर्डे, महिला नाईक पाटील, महिला कॉन्स्टेबल खैरनार, पावरा यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सॉलीड कॅफेत छापा टाकला.
यावेळी कॅफेमध्ये एका खाजगी जागेवर दोन तरुण व दोन तरुणी आढळल्यानंतर त्यांना ताब्यात समज देवून सोडण्यात आले. यावेळी झालेल्या चौकशीत या कॅफेमध्ये अधिकचे पैसे घेवून तरुण-तरुणींना आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्याची मुभा दिली जात असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी अतुल संजय निकम यांच्या फिर्यादीवरून कॅफे मालक राहुल सुरेश कोळी (28) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.




