धुळ्यातील 32 जुगार्यांवर पोलिसांनी फेकला कारवाईचा ‘एक्का’
30 लाखांचा मुद्देमाल जुप्त : आयजी पथकाच्या कारवाईने अवैध धंदे चालक हादरले
Police launched ‘Ace’ action against 32 gamblers in Dhula धुळे : नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने रंगात आलेल्या जुगाराच्या डावावर छापेमारी करीत 32 जुगार्यांच्या मुसक्या बांधल्या तर सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. ही कारवाई सोमवार, 17 रोजी रात्री करण्यात आली.
कारवाईने उडाी खळबळ
धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महिंदळे शिवारातील साक्री रोडवरील हॉटेल महिंद्राच्या पाठीमागे हिंमत शेवाळे यांच्या पत्र्यांचे मोकळ्या 32 संशयित झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असताना पथकाला आढळले. पथकाने एक लाख 56 हजार 730 रुपयांची रोकड, एक लाख 41 हजारांचे 30 मोबाईल, 14 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या 23 दुचाकी, बारा लाखांची दोन चारचाकी वाहने तसेच 38 हजारांचा टेबल व खुर्ची असा एकूण 30 लाख 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.




