भुसावळातील डॉ.निलेश महाजनांच्या एंट्रीने प्रस्थापितांना हादरा


भाजपातर्फे यावल-रावेर मतदार संघातून उमेदवारी मिळण्यासाठी दावेदारी

भुसावळ : रुग्ण सेवेचा वसा घेवून अहोरात्र काम करणारे भुसावळातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.निलेश महाजन यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी यावल-रावेर मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर लढण्यास इच्छूक आहेत. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपल्या कामांचा लेखाजोखादेखील मांडला आहे. डॉ.महाजन यांच्या ‘एन्ट्री’ ने प्रस्थापीतांना मात्र हादरा बसल्याचे बोलले जात आहे.

दरवेळी नवीन आमदारांचे वैशिष्ट्य
रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दरवेळी नवीन आमदार देण्याचा आतापर्यंत प्रघात ठेवला आहे त्यामुळे भारतीतय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेेस पक्ष, काँग्रेस पक्ष तर कधी अपक्ष असा आमदार या मतदारसंघाने यापूर्वी दिलेला आहे. एकच आमदार पुन्हा दिलेला नाही. हरीभाऊ जावळे मध्यंतरी खासदार झाले व मग पुन्हा आमदार झाले आहेत. या मतदार संघातून भाजपकडून विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे, जि.प.चे एपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, डॉ.कुंदन फेगडे, अनिल चौधरी व आता डॉ.निलेश महाजन अशी मोठी यादी आहे तर काँग्रेसकडून माजी आमदार शिरीष चौधरी, शरद महाजन, वंचित आघाडीकडुन रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद व विवेक ठाकरे तर अपक्षांमधून भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे प्रबळ दावेदार आहेत. अशा या मातब्बरांच्या यादित डॉ.निलेश महाजन आले आहेत. डॉ.महाजन हे याच मतदार संघातील पिळोदा या गावचे मूळ रहिवासी आहेत. येथे त्यांची मोठी शेती आहे. सेंद्रिय व आयुर्वेदीक शेती ऊत्पादन घेऊन त्यांनी स्थानिक शेकडो लोकांना रोजगार व उद्योग निर्माण करून दिला आहे. या मतदारसंघात शिक्षित उमेदवार सर्वच आहेत मात्र उच्च विद्याविभूषीत डॉ.निलेश महाजन आहेत. वैद्यकीय क्षेत्रात असल्याने या परीसरातील हजारो रुग्नांच्या सेवेत अहोरात्र असतात. त्यांनी राजीव गांधी जीवनदायी व महात्मा ज्योतीबा फुले अतंर्गत हजारो शस्त्रक्रीया केल्या आहेत. यामध्ये ते महाराष्ट्रात सर्वात आघाडीवरही आहेत. निवडणुकीसाठी डॉ.महाजनांची तयारी झाली असून त्या दृष्टीने ते कामालाही लागले आहेत.

भाजपाच्या पक्ष चिन्हावरच लढणार -डॉ.महाजन
भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली असू तसा रीतसर भाजपाकडे प्रस्ताव दिला आहे. पक्षश्रेष्ठींच्या भेटीदेखील आपणल घेतल्या आहेत. भाजपने उमेदवारी दिल्यानंतर आपण विधानसभेची निवडणूक लढवू अन्यथा पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू, असेही डॉ.महाजन यांनी सांगितले.


कॉपी करू नका.