नायगावातील टँकर चालकाचा नवलनगरनजीक अपघाती मृत्यू


Accidental death of tanker driver in Naigaon near Navalnagar यावल : यावल तालुक्यातील नायगाव येथील एका 58 वर्षीय टँकर चालकाचा अपघाती मृत्यू झाला. अपघातापूर्वी चालकाने आपल्या मुलाला सांगितले की, टँकरवर ड्रायव्हिंग करून थकलोय, तु ये मला घरी जावू दे. त्यामुळे मुलगा दुचाकी घेऊन धुळ्याला गेला व वडील आणि त्यांच्यासोबत असलेल्या एकाला अशा दोघांना त्याने मोटरसायकल घेऊन नायगाव जायला सांगीतले. दुचाकी घेवुन निघालेल्या टँकर चालक 58 वर्षीय इसमाचा नवलनगर जवळ अपघात घडला व यात त्यांचा मृत्यू झाला तर सोबत असलेला इसम गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी घडला. अशोक संतोष पाटील (58, नायगाव) असे मयताचे नाव आहे.

नायगावात पसरली शोककळा
पाटील हे धुळे येथे एका टँकरवर चालक म्हणून काम करतात व त्यांचा मुलगा राकेश पाटील हा देखील चालक आहे. दोघे नायगाव येथे वास्तव्यास आहेत. बुधवारी पाटील यांनी आपल्या मुलाला फोन करून सांगितले की मला खूप थकवा जाणवत आहे. मला घरी यायचं आहे तेव्हा टँकर चालवण्यासाठी तु धुळ्याला ये. त्यानंतर त्यांचा मुलगा हा नायगाव येथुन मोटरसायकलवर गावातील विजय नथ्थू पाटील (60) यांना घेऊन धुळ्याला गेला आणि त्याने टँकरवर ताबा घेत सायंकाळी वडील अशोक पाटील व विजय पाटील यांना दुचाकी देऊन तुम्ही आता नायगावला जा, असे सांगितले. दरम्यान दुचाकी घेऊन परत येत असतांना नवलनगर जवळ रात्री एका बैलगाडीला मागून दुचाकीची धडक झाली आणि या अपघातात अशोक पाटील हे जागीच ठार झाले तर विजय पाटील हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर नायगावात शोककळा
अपघाताचे वृत्त कळताच नायगाव येथून त्यांच्या नातलगांनी नवलनगर गाठले आहे. मयत अशोक संतोष पाटील यांच्यावर गुरुवारी नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत संतोष पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली पत्नी असा परिवार आहे त्यांच्या अशा मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !