राईनपाडा हत्याकांडातील नऊ संशयीत आरोपींना जामीन

पाच संशयीतांना औरंगाबाद खंडपीठाने जामीन नाकारला
धुळे : मुले पळवणारी टोळी आल्याचे समजून जिल्ह्यातील राईनपाडा येथे संतप्त जमावाने पाच जणांची हत्या केल्याची घटना गतवर्षी 1 जुलै 2018 रोजी घडली होती. संपूर्ण राज्यात गाजलेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली होती. अटकेतील 14 पैकी पाच जणांचा जामीन औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला असून अन्य नऊ जणांना मात्र जामीन मंजूर केला आहे.
मुले पळवण्याच्या संशयातून घटना
साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर 1 रोजी मुले पळवणारी टोळी समजून जमावाने पाच जणांची हत्या होती. गावाच्या आठवडे बाजारात काहीजण फिरत होते ते हे लोक मुले पळवणारे असल्याच्या संशयातून भारत शंकर भोसले (रा.खावे, मंगळवेढा), दादाराव शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), भारत शंकर मालवे (रा. खावे, मंगळवेढा), अगनू इंगोले – (रा. मानेवाडी, मंगळवेढा), राजू भोसले रा. गोंदवून (कर्नाटक) यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.