नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे अखेर निधन


Dancer Gautami Patil’s father finally passed away मुंबई : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडिल रवींद्र पाटील यांचे अखेर सोमवारी उपचारादरम्यान निधन झाले. गौतमीसह तिच्या चाहत्यांसाठी ही दु:खद घटनेने मोठा धक्का बसला आहे. गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत धुळ्यात सापडल्याची बातमी नुकतीच समोर आली होती.

पोटात नव्हते अन्न व लिव्हरही झाले खराब
रवींद्र पाटील यांना धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आल्यानंतर उपचारासाठी पुण्यात दाखल केले गेले. रवींद्र चव्हाण जेव्हा बेवारस सापडले होते तेव्हा त्यांच्या पोटात अन्न नव्हते. टीबीमुळे दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाले होते. वडील रुग्णालयात असल्याचे कळाल्यावर गौतमीने पुढील उपचारांसाठी वडिलांना पुण्यात आणले होते. वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेन. त्यांच्यावर पुढील उपचार मी पुण्यालाच करणार असल्याचे गौतमीने म्हटले होते.

वृत्ताची दखल घेत केले दखल
31 ऑगस्टच्या संध्याकाळी साडेपाच वाजता धुळ्यातील सूरत बायपास हायवेवर एक व्यक्ती बेवारस अवस्थेत स्थानिकांना आढळली. स्थानिकांनी स्वराज्य फाऊंडेशनशी संपर्क साधला. त्यानंतर स्वराज्य फाऊंडेशनचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले आणि तिथून तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गौतमी पाटीलने या वृत्ताची दखल घेत त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते मात्र आज सोमवारी दुपारी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.


कॉपी करू नका.