जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक


Condolences to Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil जळगाव : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील (75) यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. पाळधी येथील निवासस्थानी रेवाबाई यांची वृद्धापकाळाने प्राणज्योत मालवली. बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन
दरम्यान, स्व.रेवाबाई पाटील यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या पालकमुंत्री गुलाबराव पाटील, सुनील पाटील व कैलास पाटील यांच्या आई तर जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या आजी होत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत पालकमंत्र्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेश पाठवला आहे.


कॉपी करू नका.