धुळ्यात खाजगी हॉस्पीटलच्या रोखपालास लुटले
धुळे : दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधून आलेल्या तिघा तरुणांनी सिनेस्टाईल खाजगी हॉस्पीटलच्या रोखपालास लुटल्यास घटना बुधवारी सायंकाळी देवपूर परीसरात घडली. अवघ्या काही मिनिटात लुटारूंनी अडीच लाखांची रोकड लांबवत धूम ठोकली. देवपूर परीसरात विघ्नहर्ता हॉस्पीटलचे रोखपाल सरकार राजपूत हे रुग्णालयाची अडीच लाखांची रोकड घेऊनपार्किंग स्टॅण्डवरुन दुचाकी काढत असताना दुचाकीवर आलेल्या तिघा अनोळखी तरुणांनी राजपूत यांच्याकडील बॅगेसह दुचाकीही लांबवली. देवपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्यांकडून सीसीटीव्हीच्या आधार लुटारूंचा शोध सुरू आहे.