पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन गतिमंद तरुणी अत्याचारातून गर्भवती
Young dynamic young woman of Pachora taluka pregnant due to abuseपाचोरा : अत्याचारातून अल्पवयीन तरुणी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्याची बाब पाचोरा तालुक्यात उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण
पाचोरा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन गतिमंद पिडीता आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. गतिमंद मुलीचे पालक नियमित शेतमजुरी कामासाठी जात असल्याची संधी साधून अज्ञाताने 16 मे 2023 रोजी पासून ते 16 ऑक्टोबर 2023 या दरम्यान अत्याचार केला. अल्पवयीन पिडीतेचे पोट मोठे होवू लागल्याने पालकांना संशय आल्यानंतर तिची जळगाव शहरातील सरकारी रुग्णालयात तपासणी केली असता पीडीता अंदाज पाच ते सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. पीडीतेला याबाबत विचारणा केली तिला काहीही सांगता आले नाही.

अज्ञाताविरोधात गुन्हा
पीडीत मुलीच्या पालकांनी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) पोलिसात मंगळवार, 17 ऑक्टोबर रोजी धाव घेत अनोळखी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


