अवैध गौण खनिज उत्खनन : आमदार एकनाथराव खडसेंसह कुटूंबाला 137 कोटी दंडाची नोटीस


Illegal minor mineral mining : 137 crore fine notice to MLA Eknathrao Khadse and his family मुक्ताईनगर : शेतजमिनीतून अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी आमदार एकनाथराव खडसे व कुटूंबियांना मुक्ताईनगर तहसीलदारांनी तब्बल 137 कोटी रुपये दंडाची नोटीस बजावल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदारांनी मांडला होता अधिवेशनात मुद्दा
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या सातोड शिवारातील जमिनीतून राष्ट्रीय महामार्गासाठी तब्बल 400 कोटींचे उत्खनन करीत घोटाळा झाल्याचा दावाही आमदारांनी केला होता. या आरोपानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर राज्य शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली व या एसआयटीने चौकशी करीत अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरूवात करण्यात आली.

नोटीसीमुळे उडाली खळबळ
एसआयटीच्या रीपोर्टनंतर मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी खडसे कुटुंबियांना नोटीस बजावली. यात त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य 26 कोटी एक लाख 12 हजार 117 इतके दाखविण्यात आले आहे व नियमानुसार याच्या पाचपट दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली. त्यानुसार 137 कोटी 14 लाख 81 हजार 883 रुपयाचा दंड आकारण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली. आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह मंदाकिनी खडसे व परीवारातील सदस्यांच्या नावावर ही जमीन असल्याने मुक्ताईनगर तहसीलदारांनी 6 ऑक्टोबर रोजी नोटीस बजावली आहे. या नोटीसीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

वेळ आल्यावर उत्तर देणार : आमदार खडसे
शेतजमिनी आमच्या नावावर असल्यातरी अवैध उत्खननाशी आमचा दुरान्वये संबंध नाही, हा सारा राजकीय खेळ आहे. वेळ आल्यावर योग्य उत्तर देणार असल्याचे आमदार एकनाथराव खडसे म्हणाले.


कॉपी करू नका.